- पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना
- कोट्यावधीचे नुकसान
निपाणी / वार्ताहर
नवीन कारची वाहतूक करणाऱ्या दोन कंटेनरना अचानकपणे आग लागली. या आगीत दोन्ही कंटेनरसह १६ कार जळून भस्मसात झाल्या. आज शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गानजीक हिटणी फाटा येथे पेट्रोलपंपा शेजारी असलेल्या धाब्यावर ही घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, चेन्नई येथून अहमदाबादला नवीन कार घेऊन जाणाऱ्या दोन कंटेनरचे चालक जेवणासाठी धाब्यावर थांबले होते. यावेळी अचानकपणे या दोन्ही कंटेनरला भीषण आग लागली. यानंतर धाबा मालक, पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी पोलीस आणि अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच निपाणी, संकेश्वर व हुक्केरी येथील अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बंबासह घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
मात्र तत्पूर्वीच दोन्ही कंटेनरसह कार भस्मसात झाल्याने कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या परिसरात पेट्रोल पंप असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठ्या शर्थीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु उशिरापर्यंत आग पेटत होती.
0 Comments