- भरधाव क्रूझरची धडक, पत्नी गंभीर जखमी
बेळगाव / प्रतिनिधी
भरधाव क्रूझरने दुचाकीला ठोकरल्याने तारिहाळ (ता. बेळगाव) येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. तर या अपघातात त्याची पत्नी जखमी झाली आहे. होसकोटी, ता. बैलहोंगलजवळ गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे.
यल्लाप्पा परशराम तळवार (वय २६) रा. तारिहाळ असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. त्याची पत्नी कावेरी (वय २०) ही जखमी झाली असून तिला उपचारासाठी खासगी इस्पितळांत दाखल करण्यात आले आहे. नेसरगी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार मोटारसायकलवरून यल्लाप्पा व त्याची पत्नी कावेरी हे दोघे कौटुंबिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी होसकोटीला जात होते. गावाजवळच भरधाव क्रूझरने मोटारसायकलला ठोकरल्याने यल्लाप्पा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यु झाला. रात्री उशिरापर्यंत शवचिकित्सा प्रक्रिया सुरू होती.
0 Comments