सुळगे (ये.) दि. ८ मे २०२३

सुळगे (ये.) येथील द. म. शि. मंडळाच्या नेताजी हायस्कूलचा  दहावीचा निकाल ९७ टक्के लागला आहे. शाळेतील एकूण ३३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी विशेष प्राविण्यसह ४,   प्रथम श्रेणीत २१, द्वितीय श्रेणीत ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयात कु. संचिता संजय कुकडोळकर हिने ६२५ पैकी ५४९ (८८ टक्के) गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर कु. समृद्धी राजू कणबरकर हिने ६२५ पैकी ५४४ (८७.०४ टक्के) गुणांसह द्वितीय, कु. श्वेता प्रकाश मोरे हिने ६२५ पैकी ५४० (८४.८० टक्के) गुणांसह तृतीय तर सुषमा आनंद थोरवत हिने ६२५ पैकी ५२७ (८४.३२ टक्के) गुणांसह चतुर्थ क्रमांक प्राप्त केला आहे. मुख्याध्यापक एस. एन. सपाटे व इतर शिक्षकांचे यांना मार्गदर्शन लाभले. विद्यालयाने यावर्षीही उत्कृष्ट निकालाची परंपरा राखल्याने यशस्वी विद्यार्थ्यांचे व विद्यालयाचे कौतुक होत आहे.