• बेळगाव जिल्ह्याच्या हुक्केरी तालुक्यातील घटना  

हुक्केरी / वार्ताहर 

येळीमुन्नोळी (ता. हुक्केरी जि. बेळगाव) गावात तरुणाने आत्महत्या केली. आप्पासाहेब कांबळे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास गावाबाहेरच्या मळ्यातील झाडाला गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपविले. 

आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही समजू शकलेले नाही. मात्र आप्पासाहेबच्या मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित होत असल्याचे स्थानिक आणि नातेवाईकांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच हुक्केरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद हुक्केरी पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.