- तब्बल २४ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
- मंत्रिमंडळ विस्तारानंतर लागलीच खातेवाटप जाहीर
बेंगळूर दि. २७ मे (वार्ताहर) :
कर्नाटकमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केल्यानंतर आज २४ मे रोजी मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार केला. यामध्ये तब्बल २४ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे कर्नाटक राज्य सरकारमधील एकूण मंत्र्यांची संख्या आता ३४ इतकी झाली आहे.
शपथ घेतलेल्यांमध्ये दिनेश गुंडुराव, शरणबसप्पा दर्शनापुर, एचके पाटील, कृष्णा बायरे गौडा, एन चेलुवरायस्वामी, के. वेंकटेश, शिवानंद पाटील, तिम्मापुर रामप्पा बलप्पा, एसएस मल्लिकार्जुन, तंगदगी शिवराज संगप्पा, डॉक्टर एचसी महादेवप्पा, ईश्वर खांद्रे, क्याथासंद्रा एन राजन्ना, डॉक्टर शरणप्रकाश रुद्रप्पा पाटील, संतोष एस लाड, एनएस बोस राजू, सुरेश बीएस, मधु बंगारप्पा, डॉक्टर एमसी सुधाकर, मंकल वैद्य, लक्ष्मी आर हेब्बाळकर, रहीम खान, डी सुधाकर आर. बी. नागेंद्र यांचा समावेश आहे.
- मंत्रिमंडळ विस्तारानंतर लागलीच खातेवाटप जाहीर -
कर्नाटक राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारानंतर लागलीच मंत्रिमंडळातील नवनिर्वाचित ३४ मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. यात मुख्यमंत्र्यांकडे ५ हून अधिक खात्यांचा तर उपमुख्यमंत्र्यांकडे २ खात्यांचा पदभार सोपविण्यात आला आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातून मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे महिला आणि बालकल्याण तर यमकनमर्डी मतदारसंघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
- शपथ घेतलेल्या मंत्रांचे खातेवाटप खालीलप्रमाणे -
- Siddharamaiah : Finance, Cabinet Affair's, Department of Personal and administrative reforms, Intelligence, Information and unallocated portfolios
- D K Shivkumar : Major & Medium Irrigation, Bengalur City Development
- G Parmeshwar : Home (excluding intelligence)
- H K Patil - Law and Parliamentary Affairs, Legislation, Minor Irrigation
- K H Muniyyappa : Food and Civil Supplies, Consumer's Affairs
- K J George : Energy
- M B Patti : Large & Medium Industries, IT & BT
- Ramalinga Reddy : Transport
- Satish Jarkiholi : Public Works
- Priyank Kharge : Rural Development & Panchyati Raj
- BZ Zameer Ahmed Khan : Housing and Wakf and minorites
- Krishna Byre Gouda : Revenue (excluding Muzrai)
- Dinesh Gundurao : Health and Family Welfare
- N Chaluvarayaswamy : Agriculture
- K Venketesh : Animal Husbandary & Sericultural
- HC Mahadevappa : Forest, Ecology & Enviroment
- KN Rajanna : Co-operation
- Sharanabasappa Darshanpur : Small scale industries, Public sector industries
- Shivanand Patil : Textile, Sugercane Development & Directorate of suger, Agricultural Marketing from Co-operating Department
- RB Timmapu : Excise & Muzrai
- SS Mallikarjun : Mines & Geology, Horticultural
- Shivraj Tangadagi : Backward Class & ST Welfare
- Sharan Prakash Patil - Higher Education
- Mankal Vaidya : Fisheries & Ports, Inland Transport
- Lakshami Hebbalkar : Woman & Child Development, Disabled & Senior - Citizen's Empowerment
- Rahim Khan : Municipal Administration, Haj
- D Sudhakar : Infrastructure Development, Planning & Statistics
- Santosh Lad : Labour & Skill Development
- NS Boseraju :Tourism, Science & Technology
- Byrathi Suresh :
- Urban Development & Town Planning (including KUWSD8 & KUIDFC), excluding Bengaluru Development, BBMP, BDA, BWSSB, BMRDA, BMRCL
- Madhu Bangarappa : Primary & Secondary Education
- MC Sudhakar : Medical Education
- B Nagendra : Youth Service, Sports and kannada culture
0 Comments