• माजी ग्रा.पं. सदस्य सुभाष मरुचे यांचे प्रतिपादन 
  • कल्लेहोळ येथे  म. ए. समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले प्रचार फेरी आणि पदयात्रा

सुळगा (हिं.) / वार्ताहर      

बेळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये यावेळी म. ए समितीची  सत्ता येणार असून कर्नाटक विधानसभेत समितीचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय ग्रामीण मतदारसंघातील जनता स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन सुळगा (हिं.) ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुभाष मरुचे यांनी व्यक्त केले.  कल्लेहोळ गावामध्ये म. ए. समितीचे ग्रामीणचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांची प्रचार फेरी आणि पदयात्रा काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. 

प्रारंभी गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली गावातील  सर्व प्रमुख गल्ल्यामधून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी सर्व गावकऱ्यांनी आर. एम चौगुले यांना भरघोस पाठिंबा देऊन विधानसभेत पाठवणे पाठवण्याचा निर्धार केला. 

यावेळी घरोघरी सुवासिनीनी आरती ओवाळून पुष्पहार घालून आर. एम. चौगुले यांचे जंगी स्वागत केले यावेळी युवकांनी प्रत्येक ठिकाणी फटाक्यांची अतिश करून आर. एम चौगुलेना आपला भरघोस पाठिंबा व्यक्त केला यावेळी गावकरी मोठ्या संख्येने  उपस्थित होते. ही पदयात्रा गावातील सर्व प्रमुख गल्ल्यांमधून फिरवण्यात आली.


यावेळी पदयात्रेत माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, आप्पा जाधव, लक्ष्मण मरूचे, बुद्धाजी खन्नूकर, अशोक पाटील, किरण पाटील, यल्लाप्पा वेताळ, एम आर पाटील, बाळू धामणेकर, मल्लाप्पा लामजी, जोतिबा बेनके, मोनाप्पा मरुचे, मनोहर कितुर, कृष्णा मुतगेकर, मल्लाप्पा वेताळ, जोतिबा बेनके, चांगदेव वेताळ, मारुती मरुचे, अरुण मरुचे, मष्णु मरुचे गावकरी उपस्थित होते त्याशिवाय महिला वर्ग ही उपस्थित होत्या.