सुळगा (हिं.) / वार्ताहर 

बेळगाव ग्रामीण मतदार संघातील भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांच्या प्रचारार्थ रविवारी तालुक्याच्या पूर्व भागातील बाळेकुंद्री, मारिहाळ, येदलभावी, सुळेभावी, खनगांव, सिदनहळ्ळी, करीकट्टी, तुमरीगद्दी इत्यादी गावांमध्ये प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. 


बेळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा गोकाकचे विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीला माजी आमदार तथा भाजप  बेळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते




ढोलताशांच्या गजरात, फुलांची उधळण करत ग्रामस्थांनी ठिकठिकाणी या रॅलीचे स्वागत केले. महिलांनी भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांना औक्षण करून येत्या निवडणुकीत विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.


यावेळी नागेश मनोळकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन नागरिकांपुढे मांडले. 

तर गोकाकचे विद्यमान आ. रमेश जारकीहोळी यांनी  बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या विद्यमान लोकप्रतिनिधीनी विकासाच्या नावावर जनतेची फसवणूक केल्याचे सांगून या निवडणुकीत भाजपचे उमेदवार नागेश मनोळकर यांना बहुमत देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला मतदारांनीही जाहीर पाठिंबा दिला. 

एकंदरीत भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांच्या झंझावाती प्रचाराला तालुकाच्या पूर्व भागातही उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. हे पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.