बेळगाव / प्रतिनिधी 

निवडणूक आयोगाने प्रथमच  ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी घरबसल्या मतदानाचा हक्क बजाविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेच्या माध्यमातून बेळगाव शहरातील  ज्येष्ठ मतदार "बेल्लद" (वय ८०) या जेष्ठ मतदाराने सर्वप्रथम घरबसल्या मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार बेल्लद यांच्या घरी पोलीस, कॅमेरा बंद तसेच संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी भेट देऊन मतदान प्रक्रिया पूर्ण केली. निवडणूक आचारसंहितेमुळे गोपनीयता बाळगून गुप्त पद्धतीने  मतदान घेण्यात आले.