- ८ हून अधिक गायींना वाचविण्यात यश
विजयपूर / वार्ताहर
विजयपूर जिल्ह्याच्या बबलेश्वर शहरात स्थानिक पोलिसांनी गायींची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर धाड घालून कारवाई केली. या कारवाईत ८ हून गायींना वाचविण्यात यश आले. बबलेश्वर पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली.
कारवाई दरम्यान वाहन चालक फरार झाला आहे. पोलिसांनी वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले केए २८ बी ०७४२ क्रमांकाचे वाहन आणि गायी ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणाची बबलेश्वर पोलीस स्थानकात नोंद झाली असून पोलीस फरार वाहन चालकाचा शोध घेत आहेत.
0 Comments