- निवडणूक अधिकाऱ्यांची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
मतदारांना वाटप करण्यासाठी आणलेल्या शिलाई मशीन आणि टिफीन बॉक्सच्या गोदामावर धाड घालून सुमारे 42.92 लाखांचे साहित्य जप्त केले आहे. सौंदत्ती येथे निवडणूक अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. येथील अपक्ष उमेदवार सौरव चोप्रा यांच्या मालकीचे हे साहित्य आहे.
मतदारांना वाटपासाठी शिलाई मशिन्स आणि टिफिन बॉक्स साठवून ठेवल्याची माहिती मिळताच सौंदत्ती प्रांताधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकून २३,८४, २७२ किंमतीच्या १०१२ शिलाई मशिन्स , ४,५६,६०० किंमतीच्या १२०० शिलाई मशीन आणि लोखंडी टेबल जप्त करण्यात आली. ११,२७,८४० किंमतीचे १०६० स्टँड आणि ३,२४,००० किंमतीचे २१६० टिफिन बॉक्स असे एकूण ४२,९२,११२ किंमतीचे साहित्य अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. या प्रकरणी संबंधित उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक संजीव पाटील यांनी सांगितले.
0 Comments