• कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकाक पोलिसांची कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. सदर तपासणी नाक्यावर वाहनांची कसून चौकशी सुरु असून कागदपत्रांशिवाय नेण्यात येत असलेली रक्कम, दागिने जप्त  करण्यात येत आहेत . गोकाक तालुक्यातील हळ्ळूर येथेही  १ किलो सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले. दरम्यान, गोकाक येथे तपासणीवेळी बुधवारी ही कारवाई करण्यात आली. या १ किलो २५ गॅम सोन्याच्या दागिन्यांचे  कागदपत्र नसल्याने ते पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुमारे ६० लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पुढील कारवाई गोकाक पोलिस करत असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले.