बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहर परिसरात आज श्रद्धा आणि भक्तीने सामूहिक नमाज पठण करून मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद सण साजरा करण्यात आला.
रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधवांनी कडक उपवास करून रमजान महिन्याचे गांभीर्याने पालन केले. काल, शुक्रवारी संध्याकाळी चांद दिसल्याने आज शनिवारी ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरा करण्यात आला.
प्रारंभी आज सकाळी बेळगावातील अंजुमन ईदगाह मैदानामध्ये सर्व मुस्लिम बांधवानी एकत्र येऊन सामूहिक नमाज पठण करत अत्यंत उत्साह, जल्लोषात हा सण साजरा केला.यावेळी मुफ्ती अब्दुल अजीज यांनी, बेळगावातील समस्त जनतेला रमजान सणाच्या शुभेच्छा देऊन महत्व सांगितले. इस्लाम हा शांततेचा संदेश देणारा धर्म असून सर्वानी एकमेकांशी, सर्व धर्मीयांशी बंधुभावाने राहण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर सर्वानी एकमेकांना रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अंजुमन इस्लाम ईदगाह मैदानावर सर्वत्र उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण दिसून आले. मुस्लिम समाजाचे सर्व आबालवृद्ध नवे कपडे, पारंपरिक टोप्या आणि वेशभूषा करून नमाजपठणासाठी जमले होते. उत्साहाने ओसंडून वाहणारे वातावरण यावेळी पहायला मिळाले.
0 Comments