विजयपूर / दिपक शिंत्रे 

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी दि.23 एप्रिल रोजी विजयपूर शहराचा दौऱ्यावर येणार असून, सायंकाळी पाच वाजता मोठा रोड शो करणार असल्याची माहिती राज्य प्रचार समितीचे अध्यक्ष डॉ. एम. बी पाटील यांनी सांगितले.

याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना ते  म्हणाले,दि 23 रोजी कुडळसंगम येथे आयोजित बसवजयंती कार्यक्रम नंतर  सायंकाळी 5 वाजता विजयपुर शहरात येणार असून विजयपुर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य रोड शोस सुरुवात होणार असून  तेथून सुरू होणारा रोड शो गांधी चौक, डॉ.बी.आर.  आंबेडकर चौक मार्गावरुन  भक्त कनकदास चौकात येथे पोहोचतील आणि या रोड शोची सांगता होईल, तेथे जिल्ह्यातील काॅग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी जनतेला संबोधित करणार असल्याची  त्यांनी सांगितले 

या रोड शो मध्ये राज्य स्तरीय नेत्यांसह जिल्ह्यातील आठ ही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांसह १ लाखाहून अधिक कार्यकर्ते, पक्षाचे अभिमानी सहभागी होण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रा.राजू अलगुर, विजयपूर नगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अब्दुल हमीद मुश्रीफ, डॉ.महांतेश बिरादरा आदी उपस्थित होते.