- ग्रामदैवत श्री नागनाथासह घेतला ग्रामस्थांचा आशीर्वाद
- बेकिनकेरे गावात काढली प्रचारफेरी
सुळगा (हिं.) / वार्ताहर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार श्री. नागेश मन्नोळकर यांनी प्रचाराला प्रारंभ केला आहे. मतदारसंघातील गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या ते जाणून घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज तालुक्याच्या पश्चिम भागातील बेकिनकेरे गावाला त्यांनी भेट दिली. प्रारंभी ग्रामदैवत श्री नागनाथ महाराजांसह ग्रामस्थांचा त्यांनी आशीर्वाद घेतला.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ, हिंडलगा ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य रामचंद्र मन्नोळकर, हिंडलगा ग्रा. पं. सदस्य एन. एस. पाटील यांच्यासह भाजपचे बेकिनकेरे गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी श्री. नागेश मन्नोळकर यांनी भविष्यात गावातील प्रलंबित रस्ते पिण्याचे पाणी तसेच इतर समस्या सोडविण्यासाठी काम काम कारणारं असून कोणत्याही महिलेच्या डोक्यावर आता हंडा नको तर प्रत्येक घरात पाणी पोहोचायला हवं, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची जलजीवन मिशन योजना बेकिनकेरे गावामध्ये प्रभावीपणे राबवण्याचे काम येत्या काळामध्ये केलं जाईल. कोणी दिलेले मिक्सर आणि कुकर आयुष्यभर पुरणार नाहीत. मात्र युवकांच्या हाताला काम देण्याची योजना प्रभावीपणे राबवून सक्षम करण्यावर माझा भर असेल. गावाला जोडणारे चारही बाजूचे रस्ते पक्के बनवणे अत्यंत गरज असताना त्यावर गेल्या पाच वर्षात काम झालं नाही. मात्र भविष्यात पक्क्या रस्त्याने गावाला जोडले जाईल. स्थानिक नागरिकांच्या हाताला काम आणि गावचा विकास हे ध्येय घेऊन काम करण्याची ग्वाही त्यांनी बेकिनकेरे ग्रामस्थांना दिली.
दरम्यान संकल्प विकासाचा, वारसा जनसेवेचा!.. या तत्त्वाप्रमाणे काम करणाऱ्या नागेश मन्नोळकर यांना ग्रामीण भागातील जनतेतून वाढता पाठिंबा लाभत आहे.
0 Comments