•  १ कोटी ५४ लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त 
  • सीमा भागातील तपासणी नाक्यांवर वाहनांची कसून चौकशी 

रामदुर्ग / वार्ताहर 

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील तपासणी नाक्यावर वाहनांची कसून चौकशी सुरु आहे . दरम्यान  रामदुर्ग तपासणी नाक्यावर  पोलीस आणि निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी  एका कारमधून नेण्यात येत असलेली १ कोटी ५४ लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केली. याप्रकरणी चिक्करेवन्ना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार सदर रक्कम कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याच्या रामदुर्ग तालुक्याचे भाजप उमेदवार चिक्करेवन्ना यांच्याशी संबंधित एका कार्यकर्त्याच्या गाडीत सापडली आहे.

एका कारमधून बेहिशेबी रक्कम नेण्यात येत असल्याची माहिती रामदुर्ग पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सदर कार अडवून  झडती घेण्यात आली. याप्रकरणी आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. आयकर विभागाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.