बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज छाननीनंतर बेळगाव तालुक्याच्या तीनही मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने अधिकृत चिन्ह दिले आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघातील समितीचे अधिकृत उमेदवार ॲड. अमर येळळूरकर यांना (घागर), दक्षिण मतदार संघातील समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत दादा कोंडुसकर यांना (ट्रक) तर ग्रामीण मतदार संघातील समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांना (घागर) हे चिन्ह मिळाले आहे.
मराठीच्या अस्मितेसाठी सातत्याने लढा देणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांना निवडणुकीसाठी चिन्ह मिळाल्याने समिती नेते आणि पदाधिकाऱ्यांना प्रचार करण्यास सोयीस्कर झाले आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे तिन्ही मतदारसंघातील उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून अधिकृत चिन्ह मिळाल्यानंतर गत निवडणुकीतील इतिहास पुसून तिन्ही उमेदवारांना निवडून आणण्याच्या निर्धाराने समितीने नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी कंबर कसली आहे.
0 Comments