• महिलांचा विश्वास जबाबदारी वाढविणारा नागेश मन्नोळकर यांना आत्मविश्वास
  • नागरिकांपुढे मांडले विकासाचे व्हिजन  


सुळगा (हिं.) / वार्ताहर  

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीण मतदार संघातील भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मन्नोळकर यांनी ग्रामीण भागात जोरदार  प्रचार सुरु केला आहे. तालुक्याच्या प्रत्येक गावात प्रचारफेऱ्या काढून नागरिकांशी संवाद साधला जात आहे. दरम्यान आज सोमवार दि. २४ एप्रिल रोजी ग्रामीण भागातील बाकनुर, बडस आणि बेळवट्टी गावात प्रचारफेरी काढण्यात आली. 

प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन आणि विठ्ठल रखुमाई मंदिरात दर्शन घेऊन प्रचारफेरीला सुरुवात करण्यात आली. 



गावातील महिलांनी जागोजागी औक्षण करत नागेश मन्नोळकर यांचे स्वागत केले. प्रचार फेरीच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आणि आगामी काळामध्ये गावांच्या विकासासाठी असणारे व्हिजन  स्पष्ट केले. 


नागरिकांच्या भेटी घेत असताना झालेले स्वागत पाहून त्यांचा विश्वास मन्नोळकरांची जबाबदारी वाढवणारा आहे. त्यामुळे या निवडणुकीत नागेश मन्नोळकर यांचा  विजय निश्चित असल्याची चर्चा मतदारसंघात सर्वत्र सुरु आहे.