सुळगा (हिं.) / वार्ताहर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अद्यापही उमेदवार यादीची घोषणा करण्यात आलेली नाही. अशातच आता बेळगाव ग्रामीण मतदारसंघातही उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. पक्षश्रेष्ठींना सखोल विचार करुन उमेदवाराची निवड करावी लागणार आहे.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून पक्षश्रेष्ठींकडे गेलेल्या ३ नावांमध्ये बेळगाव ग्रामीण भाजपचे माजी अध्यक्ष तथा मराठा नेते विनय कदम यांचे नाव आघाडीवर आहे.
आरएसएसचे स्वयंसेवक असलेले विनय कदम हे गेल्या वीस वर्षापासून भाजप पक्षात कार्यरत आहेत. ग्रामीण मतदारसंघात पक्ष मजबूत करण्यासाठी विनय कदम महत्वपूर्ण योगदान देत आहेत. सामाजिक कार्याबरोबरच तळागाळात काम करताना पक्षातील मराठा समाजाचे नेतृत्व अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण मतदारसंघातून विनय कदम यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
एकंदरीतच या सर्व परिस्थितीत भाजप पक्षश्रेष्ठी बेळगाव ग्रामीण मतदारसंघात कोणाला उमेदवारी देणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
0 Comments