चंदगड / लक्ष्मण यादव
ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि भारतीय जनता पार्टी (चंदगड विधानसभा मतदारसंघ) यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दि. ९ एप्रिल रोजी महाआयोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.सदर शिबिर हलकर्णी भाग हायस्कूल, जुनियर कॉलेज व व्यवसाय शिक्षण विभाग हलकर्णी (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथे स. १० ते सायं. ४ यावेळी होणार आहे.
या शिबिरात वेगवेगळ्या आजारांच्या तपासण्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत केल्या जाणार आहेत. तरी या महाआरोग्य शिबिराचा गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments