- जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे निर्देश
बेळगाव / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत कोणत्याही धार्मिक ठिकाणांचा उपयोग हा राजकीय उद्देशाने करण्यात येऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले आहेत.
२९ मार्चला कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून तेव्हापासून आचारसंहिता सुरू झाली आहे. १० मे रोजी मतदान व १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. तर निवडणूक प्रक्रिया १५ मे रोजी पूर्ण होणार आहे. या दरम्यान निवडणुक आयोगातर्फे प्रचारांसाठी नियमावली निश्चित करण्यात आली आहे. त्याचे काटेकोर पालन व्हावे. निवडणूक प्रचार किंवा कार्यक्रमांसाठी धार्मिक स्थळांचा वापर करण्यात येऊ नये, असे जिल्हाधिकारी पाटील यांनी कळविले आहे.
0 Comments