• पदयात्रेतून साधला कुद्रेमनी ग्रामस्थांशी संवाद
  •  ग्रामस्थांचा पदयात्रेला लक्षणीय प्रतिसाद 

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बेळगाव ग्रामीण मतदार संघातील कुद्रेमनी गावात आज शनिवारी भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मन्नोळकर यांच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात होते.  प्रारंभी गावातील गणपती मंदिरात दर्शन घेऊन पदयात्रेला सुरुवात झाली. 

पदयात्रे दरम्यान  नागेश मन्नोळकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच  केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी असणारा संकल्प नागरिकांना सांगितला. यावेळी ग्रामस्थांनी लक्षणीय  प्रतिसाद देत बेळगाव ग्रामीण मतदारसंघात शतप्रतीशत भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहण्याचा नारा दिला. यावेळी श्री. धनंजय जाधव (अध्यक्ष, बेळगाव ग्रामीण मंडळ), श्री. काशिनाथ नाईक, श्री. राजू पोटे  तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.