• ग्रामस्थ भाजप आणि नागेश मन्नोळकर यांच्या पाठीशी 
  • ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रचार 

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

कर्नाटक विधानसभा निवडणुक प्रचारानिमित्त आज बेळगाव ग्रामीण मतदार संघातील आंबेवाडी गावात भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली  प्रचारफेरी काढण्यात आली. या प्रचारफेरीला उस्त्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ग्रामस्थांनी भाजप आणि नागेश मन्नोळकर यांना जाहीर पाठिंबा दिला.  


प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मूर्तीला अभिवादन करून प्रचार फेरीला सुरुवात झाली. यानंतर ग्रामदैवत श्री घळगेश्वराचे दर्शन घेण्यात आले.

महिलांनी प्रचारफेरीचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी हिंडलगा ग्रा.पं. माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.