- वाहनासह चालक ताब्यात
बेळगाव / प्रतिनिधी
कागदपत्रांशिवाय वाहतूक करण्यात येत असलेले चांदीचे सुमारे १४ किलो १११ ग्रॅम दागिने हिरेबागेवाडीनजीक जप्त करण्यात आले. यावेळी चालकासह वाहतुकीसाठी वापरलेले वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शशांक पाटील असे ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव आहे. जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांची एकूण किंमत ९८७७७० रु. आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, एमएच ०९ सीएम ५२४९ या वाहनातून चालक शशांक पाटील उपरी (महाराष्ट्र) ते हुबळी येथे चांदीच्या दागिन्यांची वाहतूक करत होता. यावेळी हिरेबागेवाडी नजीक वाहन थांबवून तपासणी केली असता, त्याच्याकडे दागिन्यासंबंधी कोणतीही कागदपत्रे आढळून न आल्याने पोलिसांनी दागिने जप्त करून वाहनासह त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments