- भाजप ग्रामीण माजी अध्यक्ष विनय कदम यांच्या प्रयत्नांना यश
- कल्लेहोळ ग्रामस्थांतर्फे करण्यात आला सत्कार
![]() |
फोटो सौजन्य : श्री. विनय विलास कदम (भाजप ग्रामीण माजी अध्यक्ष) |
बेळगाव ग्रामीण मधील कल्लेहोळ गावामध्ये मराठा समाजासाठी थ्री बी सामान्य मधून टू डी आरक्षण मिळवून दिल्याबद्दल भाजपा ग्रामीण माजी अध्यक्ष विनय विलास कदम यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना विनय कदम म्हणाले, आपला मराठा समाज अन्य समाजाच्या तुलनेत आर्थिक सामाजिक शैक्षणिक रित्या मागासलेला आहे.तरी कर्नाटक मराठा विकास निगमच्या वतीने मराठ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व शिक्षणासाठी योजना राबविण्यात येत आहेत व त्याचा उपयोग मराठा समाजातील होतकरू युवक- युवतींनी करून घ्यावा तसेच शिक्षणासाठी येणारा खर्च सुद्धा निगमच्या माध्यमातून मिळवून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. कर्नाटक सरकारने आपल्याला 3B सामान्य मधून 2D मध्ये आरक्षण दिले आहे. तरी समाजातील सर्व स्तरांना याचा उपयोग होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विनय कदम साहेबांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा - अनिल पाटील, ग्रा. पं. सदस्य कल्लेहोळ
यावेळी कल्लेहोळ ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील म्हणाले, विनय कदम साहेबांचे जितके आभार व अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे. कारण त्यांनी भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीणमध्ये तळागळापर्यंत पोहोचवली. पक्षा बरोबरच आपल्या सोबत आलेल्या सर्व मराठा बांधवांचे सुद्धा त्यांनी कोणत्या ना कोणत्या योजना देऊन मराठा समाजासाठी कार्य केले आहे. बेळगाव ग्रामीणमधील बहुसंख्य समाज हा मराठा असल्याने विनय कदम साहेब यांनी पक्षाकडे मराठा नेतृत्वाचा हक्क या अधिकाराने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागतली आहे. तरी त्यांच्या या उमेदवारीसाठी कल्लेहोळ गावचा पूर्णपणे पाठिंबा व्यक्त केला.
याप्रसंगी पुंडलिक दूधाप्पा मरुचे,अशोक बाळेकुंद्री, चांगदेव वेताळ,गोविंद पाटील,लक्ष्मण डिकप्पा लामजी,बाळू खातो कित्तूर, विलास मरुचे,मल्लाप्पा पाटील,मराठा निगमच्या योजनांसाठी कार्य केलेल्या सुरेखा रमेश खन्नूकर, सुरेखा मनोहर पेडणेकर, प्रभावती आनंद मरूचे,ज्योती दीपक पाटील,रेणुका गोविंद पाटील, भारतीय जनता पार्टी कल्याणचे कार्यकर्ते , कल्लेहोळचे कार्यकर्ते सुरज अशोक पाटील,युवराज मरुचे,परशराम पाटील,योगेश मरुचे, इस्कॉन पदाधिकारी महिला व युवक उपस्थित होते.
0 Comments