• सांबऱ्यात वादळी पावसामुळे महामार्गावर कोसळले झाड 
  • महामार्ग ठप्प ; वाहनांच्या लांबच लांब रांगा 

सांबरा / मोहन हरजी

बेळगाव तालुक्यात आज वळीव पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. विशेषतः तालुक्याच्या पूर्व भागात सांबरा येथे आज दुपारी सुमारे तासभर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे झाड कोसळून महामार्ग ठप्प झाला होता. यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

गेल्या चार दिवसांपासून बेळगाव परिसरात उष्णतेचा कहर वाढला असून दिवसाचे तापमान सुमारे ४० अंश सेल्सिअस इतके नोंदविले जात आहे. दरम्यान हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे बेळगाव शहरासह तालुक्याला वळीवाने झोडपले आहे. सकाळी ऊन दुपारी ढगाळ वातावरण आणि सायंकाळी वादळीवाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस हे चित्र नेहमीच पाहायला मिळत आहे.