• बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजप बुथप्रमुख, कार्यकर्त्यांची बैठक
  •  विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने केले होते आयोजन
  •  काँग्रेसच्या एसटी सेल पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश     



सुळगा (हिं.) / वार्ताहर 

आगामी निवडणुकीत बेळगाव ग्रामीण मतदारसंघात भाजपचे  कमळ फुलविण्याचा निर्धार मतदार संघातील बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शुक्रवारी बेळगाव ग्रामीण मतदार संघातील बुथप्रमुख आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजप नेते तथा माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

यावेळी सौ. चित्राताई वाघ (महिला प्रदेशाध्यक्षा, महाराष्ट्र),


संजय पाटील (माजी आमदार, जिल्हाध्यक्ष) धनंजय जाधव (भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष) रमेश देशपांडे (बेळगाव ग्रामीण प्रभारी) यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. 

यावेळी किरण जाधव (राज्य ओबीसी मोर्चा सरचिटणीस) भाग्यश्री कोकितकर(महिला मोर्चा अध्यक्षा, बेळगाव ग्रामीण) सोनाली सरनौबत (महिला मोर्चा, उपाध्यक्षा) भाजप नेते भरत पाटील, युवराज जाधव (जिल्हा उपाध्यक्ष) यल्लेश कोलकार (जिल्हा एससी मोर्चा अध्यक्ष) उमेश पुरी( ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष) यांच्यासह इतर मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 'काँग्रेसच्या एसटी सेल पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश'

बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचा एसटी सेल विसर्जित करून पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशभरात समाजाच्या उन्नतीसाठी सुरू असणाऱ्या कामामुळे प्रभावित होत या पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये येण्याचा निर्णय घेतला. 

व्हळप्पा बुरली (ब्लॉक उपाध्यक्ष) बसवराज कुंदरर्गी, सुजित पाटील, मलप्पा तानसी, नागेश तारिहाळ, शंकर होसुर, मलप्पा कुंदर्गी,  पकीर तारिहाळ, हनुमंत तारिहाळ यांनी यावेळी पक्षप्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत एकदिलाने काम करून विजयश्री खेचून आणण्याचा निर्धार केला.