गोकाक / वार्ताहर 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकाक तालुक्यातील मालदिनी क्रॉस येथे उभारलेल्या चेक पोस्टवर केएसआरटीसी परिवहनच्या बसची तपासणी केली असता. एका प्रवाशाकडून कोणतीही कागदपत्र नसलेली ६५ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. 

याबाबत गोकाक ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केएसआरटीसी परिवहन मंडळाची केए ३८ एफ १२९३ ही  बस बेळगावहून औरदकडे जात होती. गोकाक तालुक्यातील मालदिनी क्रॉस येथे उभारलेल्या चेक पोस्टवर बसची तपासणी करताना सिंदगी (जि. गुलबर्गा) येथे जाणाऱ्या प्रवाशाकडील बॅगची तपासणी केली असता, ही रक्कम आढळून आली. 

या  प्रकरणी निवडणूक अधिकारी गीता कौलगी, तहसीलदार मंजुनाथ. के, यांच्या मार्गदर्शनाखाली  उपजिल्हा पोलीसप्रमुख पी. डी. मुल्ला, उपनिरीक्षक पी. आर. यातनूर तपास करीत आहेत.