चंदगड / लक्ष्मण यादव 

खास हरिनाम सप्ताह निमित्त मौजे मांडेदुर्ग (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे उद्या दि. २ एप्रिल रोजी रात्री ठीक १० वा. नाट्यसंस्कार निर्मित,  दयानंद सरवणकर लिखित (मलतवाडी) आणि मांडेदुर्ग ग्रामस्थ परिवार प्रस्तुत धमाल बाब्या सख्याची हे दोन अंकी तमाशा प्रधान नाटक होणार आहे.

अमोल पाटील, शिवाजी पाटील, जकणु मुरकुटे, प्रकाश पाटील, साईश साखरे, धनश्री, मृण्मयी  जोशी आणि दयानंद सर्वणकर हे सर्व मुंबईतील कलाकार नाटकात भूमिका साकारणार आहेत.  तरी सर्व ग्रामस्थ व नाट्य रसिकांनी नाट्य प्रयोगाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.