• गौतम बगादी नूतन प्रादेशिक आयुक्त

बेळगाव / प्रतिनिधी 

विधानसभा  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांची बदली झाली असून त्यांच्या जागी गौतम बगादी यांची नियुक्ती झाली आहे. सोमवारी ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. निवडणूक आचारसंहिता जारी झाल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांची अन्यत्र बदली केली जाते याच निकषावर हिरेमठ यांची बदली झाली आहे. ते मूळचे बेळगाव जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे निवडणूक कालावधीसाठी त्यांची कर्नाटक ग्रामीण मूलभूत सुविधा विकास महामंडळाकडे बदली केली आहे. 

बेळगावच्या प्रादेशिक आयुक्त पदासोबतच  त्यांच्याकडे या मंडळाचाही कार्यभार होता. परंतु पुढील दीड ते दोन महिने ते पूर्णवेळ  तेथे काम करणार आहेत. सन २००९  बॅचचे आयएएस अधिकारी  गौतम बगादी यांनी यापूर्वी जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. सोमवारी ते प्रादेशिक आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.