सुळगा (हिं.) / वार्ताहर 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची बेळगाव ग्रामीण मतदार संघातील भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांच्या प्रचारार्थ  उद्या गुरूवार दि. २७ एप्रिल रोजी दुपारी १ वा. मिसाळे लॉन्स येथे भव्य सभा होणार आहे. भाजपकडून ग्रामीण मतदार संघाच्या पश्चिम भागात होणार असलेल्या या  सभेमुळे  येथील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने आपले सर्व स्टार प्रचारक उतरवले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा  यांच्यासह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ हे आधीच कर्नाटकात प्रचारात व्यस्त आहेत.