सुळगा (हिं.) / वार्ताहर  

भेंडीगिरी (ता.बेळगाव) येथील ग्रामदैवत श्री. संगमेश्वर यात्रेच्या निमित्ताने बेळगाव ग्रामीण मतदार संघातील भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मन्नोळकर यांनी आज भेंडीगिरी गावाला भेट दिली. 




तसेच संगमेश्वराचे दर्शन घेत उत्सवात सहभागी होत ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तरुणांचा उत्साह अवर्णनीय होता.