• म. ए. समिती अधिकृत उमेदवारांच्या घेणार प्रचारसभा 

बेळगाव / प्रतिनिधी 

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दि. ३ मे रोजी बेळगाव मध्ये येणार आहेत. त्यामुळे समिती उमेदवारांच्या प्रचाराला वेगळीच रंगत चढणार आहे. बेळगाव उत्तर, दक्षिण, आणि ग्रामीण तसेच खानापूर मतदारसंघातील  समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार सभा ते घेणार आहेत. यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनीही खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन प्रचार सभा घेण्याची विनंती केली आहे.