बेंगळूर / प्रतिनिधी 

खानापूर तालुका विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विठ्ठल हलगेकर यांनी आज राज्याचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुराप्पा यांची बेंगळूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतला. यावेळी येडियुरप्पा यांचे सुपुत्र विजयेंद्र उपस्थित होते.


विजयेंद्र यांना शिकारीपुर मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळाल्याबद्दल विठ्ठल हलगेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांच्यासह अभिजीत चांदीलकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.