सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांचा आज मंगळवारी  तालुक्यातील बोकनुर गावात प्रचार करण्यात आला. यावेळी बोकनुर  ग्रामस्थांनी भाजप आणि नागेश मनोळकर यांना जाहिर पाठिंबा दिला.




प्रारंभी मंगळवारी सकाळी नागेश मनोळकर यांनी तालुक्यातील बोकनुर गावामध्ये श्री लक्ष्मी देवी मंदिरात दर्शन घेऊन आजच्या दिवशीच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासमवेत स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. गावात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले.





प्रचारफेरीच्या माध्यमातून त्यांनी ग्रामस्थ, महिलांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच आगामी काळामध्ये गावांच्या विकासासाठी असणारे व्हिजन स्पष्ट केले.

ग्रामीण मतदारसंघातून नागेश मन्नोळकर यांना पाठिंबा वाढला आहे. परिणामी या निवडणुकीत  नागेश मन्नोळकर यांचा विजय निश्चित असून ग्रामीण मतदारसंघात भाजपचे कमळ फुलणार अशी चर्चा मतदारसंघात सर्वत्र सुरू आहे.