येळळूर / वार्ताहर 

येळळूरची ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी  देवीचा वार्षिक यात्रोत्सव  सोमवार दि. १० एप्रिल पासून सुरू होणार आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही  यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन चांगळेश्वरी  विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे. हा यात्रोत्सव सलग ४ दिवस चालणार आहे. यानिमित्त सोमवार दि. १० रोजी आंबील गाड्यांची तर मंगळवारी सकाळी ११ वा. बैलजोड्या जुंपून गावभर मिरवणूक काढण्यात येणार आहे.

सायंकाळी ५ वा. श्री. कलमेश्वर मंदिरासमोर प्रथम इंगळ्यांचा  कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वा. ग्रामदेवता श्री चांगेश्वरी देवीच्या मंदिरासमोर इंगळ्यांचा  कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि. १२ रोजी श्री महालक्ष्मी देवीचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. तर गुरुवारी  प्रतिवर्षाप्रमाणे येळळूरच्या महाराष्ट्र मैदानात जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आल्याचे चांगळेश्वरी   विश्वस्त मंडळ व यात्रा कमिटीतर्फे कळविण्यात आले आहे.