- सुमारे रु. 40 लाखांच्या विविध भेटवस्तू जप्त
विजयपूर / दिपक शिंत्रे
मुद्देबिहाळ तालुक्यातील बालाजी शुगर्स कारखान्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी दुसऱ्यांदा छापा टाकून सुमारे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 40 लाखांच्या विविध भेटवस्तू सापडल्या आहेत.
निवडणूक अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता, शेकडो बॉक्समध्ये भेट वस्तू संग्रहित होत्या. मार्च 27 रोजी पहिल्यांदा छापा टाकला असताना लाखो रुपयाच्या भेटवस्तू. माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस. आर. पाटील यांचे चित्र असलेले भिंतीवरील घड्याळ आणि टी-शर्ट सापडले होते. आता पुन्हा सुमारे रु. 40 लाखांच्या भेटवस्तू सापडल्या आहेत.
या कारवाई दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विजयमहंतेश बी. दान्नम्मनवर, एसपी एच. डी. आनंद कुमार, जिल्हा परिषद सीईओ राहुल शिंदे, एएसपी शंकर मारिहाळा, पीएसआय आरिफ मुशापुरी आदी उपस्थित होते.
0 Comments