बेळगाव / प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याला ताबा नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जयेश पुजारीला बेळगावमध्ये अटक झाली होती. त्यानंतर त्याचा ताबा घेण्यासाठी नागपूर पोलिसांची एक पथक बेळगावला आले होते. हे पथक आता आरोपी जयेश पुजारीला घेऊन नागपूरला परतले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे तीन फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावेळीही नागपूर पोलिसांनी बेळगावात येऊन त्याची चौकशी केली होती. धक्कादायक म्हणजे जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने दोनदा धमकीचे कॉल आले होते. जयेश पुजारी बेळगावच्या जेलमध्येच होता. त्यानंतर पुन्हा जयेश पुजारीच्या नावाने दुसऱ्यांदा धमकीचा फोन आला. त्यामुळे नागपूर पोलीस जयेशला चौकशीसाठी ताब्यात घेऊन नागपूरला आले आहेत.
0 Comments