नवी दिल्ली दि. २९ मार्च :
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आज सकाळी ११.३० वा. झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक प्रक्रियेची घोषणा केली. या पत्रकार परिषदेला आयुक्त अनुपचंद्र पांडे आणि आयुक्त अरुण गोयल हे उपस्थित होते. दरम्यान निवडणूक जाहीर होताच आज बुधवारपासून राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणूक प्रक्रिया :
मतदानाची तारीख : १० मे २०२३
मतमोजणीची तारीख : १३ मे २०२३
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : १३ ते २० एप्रिल २०२३
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : २४ एप्रिल २०२३
गेल्या वेळेप्रमाणे यावेळेसही कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मे महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणूक होणार आहे अलीकडेच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत निवडणूक तयारीचा आढावा घेतला होता.
0 Comments