(फोटो सौजन्य : रवींद्र वर्पे )

चंदगड / लक्ष्मण यादव 

सर्वोदय संस्था संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कोवाड येथे रौप्य महोत्सवी वार्षिक पारितोषिक वितरण, स्नेहसंमेलन आणि माजी विद्यार्थी स्नेहमेळावा असा संयुक्त कार्यक्रम रविवार दि. १९ मार्च रोजी नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.

सन १९९८ ते  सन २०२२ पर्यंत महाविद्यालयातून कला, वाणिज्य, संगणक आणि विज्ञान शाखेतून पदवी घेतलेले जवळपास ४०० विद्यार्थी - विद्यार्थीनी एकत्र आले होते. रविवारी सकाळी फनी गेम्स व इतर मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून माजी विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. 

त्यानंतर माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व  कॉलेज अंतर्गत शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडल्या. यावेळी  माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष नरसिंग पाटील, दिलीप आवडण, लक्ष्मण यादव, अजित व्हन्याळकर, संगीता पाटील यांनी महाविद्यालयाला भरघोस अशी आर्थिक मदत दिली आणि मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.



 (व्हिडिओ सौजन्य : संदीप तारिहाळकर) 

याप्रसंगी बाळकृष्ण गणाचारी, संजय पाटील, संतोष शारबिद्रे, अजित पाटील, कमल कुंभार यांच्यासह माजी विद्यार्थी विद्यार्थीनींनी आपल्या कॉलेज जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला आणि महाविद्यालयाप्रती ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांगळे यांनी महाविद्यालयाच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचे योगदान स्पष्ट करून त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा दिल्या.


प्रारंभी महाविद्यालयामार्फत प्रा. डॉ. एम. एस. पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी विद्यार्थी समिती प्रमुख डॉ. दीपक पाटील यांनी मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे होते. यावेळी संस्थेचे सचिव एम. व्ही. पाटील यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेऊन माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रा. प्रतिनिधी एस. जे. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मोहन घोळसे यांनी केले. तर आभार डॉ. श्रीकांत पाटील यांनी मानले. मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ. दीपक पाटील, डॉ. व्ही. के. दळवी, प्रा. व्ही.आर.पाटील, प्रा. आर. टी. पाटील, सर्व प्राध्यापक, आजी - माजी विद्यार्थी संघटना यांनी परिश्रम घेतले.