- विजयपूर शहराच्या सोलापूर मार्गावरील घटना
विजयपूर / वार्ताहर
ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार तर अन्य एक जण जखमी झाला. विजयपूर शहरातील सोलापूर मार्गावर सोमवार दि. २० मार्च रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. उमर बुडानसाब लाटी (वय २२, रा. चंदाबावडी विजयपूर) असे मृताचे नाव आहे. तर जखमीवर विजयपूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार उमर व अन्य एकजण दुचाकीवरून सोलापूर मार्गावरून चंदाबावडीकडे आपल्या घरी निघाले होते.
यावेळी सोलापूरच्या दिशेने निघालेल्या ट्रकची चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीला धडक बसून अपघात झाला. अपघातानंतर विजयपूरच्या वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विजयपूरच्या सरकारी रुग्णालयात पाठविला आणि अपघात ग्रस्त ट्रक ही ताब्यात घेतला. या अपघाताची नोंद विजयपूरच्या वाहतूक पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments