बेळगाव / प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे बेळगाव तालुक्यातील गुंजेनट्टी या गावात होळी निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या यात्रोत्सवात भाविकांचा महापूर आलेला पाहायला मिळत आहे. होळी पौर्णिमेच्या दुसरे दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा भरविली जाते. या यात्रोत्सवासाठी यंदा यात्रा कमिटीने योग्य नियोजन केले असून मंदिरात दर्शनासाठी तसेच यात्रा परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
यात्रेला होणारी गर्दी लक्षात घेत गैरसोय टाळण्यासाठी आसपासचे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले असून यात्रा परिसरात विविध दुकाने देखील थाटण्यात आली आहेत.
0 Comments