- हलगा (विजयनगर) येथील घटना
- हजारो रुपयांचे नुकसान
बेळगाव / प्रतिनिधी
विजयनगर तारिहाळ रोड हलगा येथे शॉर्टसर्किटमुळे एका किराणा दुकानसह टू व्हीलर गॅरेजआगीच्या भक्षस्थानी पडले. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
परिसरातील ग्रामस्थांना घटनेची माहिती मिळेपर्यंत वाऱ्यामुळे आगीचा भडका उडून किराणा दुकानातील साहित्य जळून भस्मसात झाले होते. तसेच टू व्हीलर गॅरेजचेही नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत हजारो रुपयांचे नुकसान झाले.
0 Comments