• अथणी (ता. बेळगाव) येथील एकाला अटक

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथे होणाऱ्या गोवा बनावटीच्या बेकायदा मद्य वाहतुकीवर आंबोली पोलिसांनी कारवाई करीत सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कलमेश अल्लाप्पा मुलाबट्टी (वय ३६, रा.अदालट्टी, ता. अथणी, जि. बेळगाव) याला अटक करून त्याच्यात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिम्बोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या बेकायदा गोवा बनावटीच्या मद्यवाहतुकीवर कारवाई सुरू आहे.

आंबोली पोलीस चेक पोस्टवर वाहनांची तपासणी करत असताना मंगळवारी सकाळी कर्नाटक पासिंगची आलिशान एन्जॉय कार सावंतवाडीहून बेळगावच्या दिशेने वाहतूक करीत होती. तिला थांबवून तपासणी केली असता गोवा बनावटीच्या मद्याचा अवैधसाठा कारमध्ये असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संशयितासह सव्वा लाख रुपयाचा मुद्देमाल आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली

 ४ लाखांची कार जप्त केली. या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक शिंदे, दत्ता देसाई, होमगार्ड जंगले यांचा सहभाग होता.