- खानापूर शहर पोलिसांची कारवाई
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक रामचंद्र नायक यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी मोहिमेला प्रारंभ केला आहे.
या मोहिमेअंतर्गत शहरात १५ लिटर मद्याचा बेकायदा साठा जप्त करण्यात आला, मात्र आरोपी फरार झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रकाश राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक के.आय.बडिगेर, जे. ए. हम्मनवर, ए. एम.सनदी, जे.आय. कद्रोळी, ए. एन. जिन्नववागोळ, एम. एल. मुसळी, एस. ए. सतप्पन्नवर, व्ही.एम. बांगी यांनी सहभाग घेतला होता.
0 Comments