• तेगूर ता. धारवाड येथील घटना
  • कारची धडक बसल्याने वृद्ध जागीच ठार


धारवाड / वार्ताहर 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बेळगाव येथील सीपीएड मैदानावरील जाहीर सभा आटोपून गावी परतणाऱ्या हुबळी येथील एका वृद्धाचा पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तेगूर (जि.धारवाड) नजीक अपघाती मृत्यू झाला आहे. गरग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. अब्दुल खादर मुजाती (वय ७० रा. एस. एम. कृष्णनगर, हुबळी) असे त्या दुर्दैवी वृद्धाचे नाव आहे. राहुल गांधी यांची जाहीर सभा आटोपून ते हुबळीला निघाले होते.

तेगुर नजीक जेवणासाठी वाहन उभे करण्यात आले होते. महामार्ग ओलांडताना कारची धडक बसून या वृद्धाचा मृत्यू झाला. पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तेगूर नजीक सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. गरग पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी पुढील  तपास करीत आहेत.