• हुबळी आणि धारवाड बायपासनजीक घटना 

धारवाड / वार्ताहर 

ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह अन्य एकाचा जागीच मृत्यू झाला. हुबळी - धारवाड बायपास रस्तावर इटिगट्टीनजीक ही दुर्घटना घडली. 

भीमराव गोसावी (वय ३८) व एकनाथ गोसावी (वय ४०) अशी मृतांची नावे आहेत. अपघातानंतर  हुबळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. या प्रकरणाची हुबळी ग्रामीण पोलिस स्थानकात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.