विजयपूर / दिपक शिंत्रे
बीएलडी सौहार्द सहकारी संघाच्या नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा बीएलडीई संस्थेच्या बंगारम्मा सज्जन प्रांगणात पार पडला.
बीएलडीई संस्थेचे अध्यक्ष आणि काॅंग्रेस पक्षाचे राज्य प्रचार समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. एम. बी. पाटील यांच्या हस्ते नूतन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी अधिकार्यांकडून सौहार्दाची माहिती घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर विधान परिषद सदस्य सुनील गौडा पाटील, बीएलडीई डीम्स विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वाय. एम. जयराजा, प्राचार्य डॉ. अरविंदा पाटील, कुलसचिव डॉ. आर. व्ही. कुलकर्णी, संस्थेचे वित्तीय अधिकारी डी. के. अग्रवाल, डॉ. राजेश होन्नूटगी, डॉ. एम. बी. पाटील, डॉ. विजयकुमार कल्याणप्पागोला, डॉ. विजयकुमार वर्ण, डॉ. रवी बिरादरा, डॉ. उदयकुमार नुची, प्रा. जी. आर. अंबाली, प्रा. ए. ए. कनमडी, महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. संजय कडलीमट्टी, डॉ. एम. आर. मिर्दे, डॉ. डॉ. चोरमण चोपडे, प्रकाश सिद्धापूर, डॉ. भारती खासनिस, मल्लन्ना कुप्पी, प्रशासकीय अधिकारी आय. एस. कलाप्पनवर, एस. ए. बिरादरा (कन्नाळा), शंकरगौडा पाटील, अधिकारी, पी. के. हुन्नूर, व्ही. डी. कनमडी, व इतर उपस्थित होते.
0 Comments