विजयपुर / दीपक शिंत्रे
हृदयविकाराने त्रस्त असलेल्या एका गरीब बांधकाम कामगाराला शस्त्रक्रियेसाठी मदत करून विधान परिषद सदस्य सुनील गौडा पाटील यांनी माणुसकी दाखविली
विजयपूर शहरातील इंडी रोड येथील हनमंता गोठे (वय 28) यांना हृदयविकाराचा आजार होता. बांधकाम मजूर असलेल्या या तरुणाने त्याचे वडील, आई आणि पत्नी गमावले असल्यामुळे तो अत्यंत संकटात होता. हे जाणून सुनील गौडा पाटील यांनी त्या तरुणाला श्री बी. एम. पाटील यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करून माणुसकी दाखवली आहे.
आता तो तरुण बरा झाला असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते सकाळीच मित्रांसह आले आणि त्यांनी सुनील गौडा पाटील यांचे आभार मानले. यावेळी अप्पुगौडा इंडी, शब्बीर पटेल, गोविंद पवार, किट्टू गाडीवड्डार व इतर उपस्थित होते
हनमंता गोठे यास हृदयविकाराचा त्रास होत होता. खाजगी उपचारासाठी त्यासाठी रु 1.20 लाख खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते, शिवाय या तरुणाकडे आरोग्य योजनेचे कार्डही नव्हते. त्यामुळे त्याचा मित्रांनी सुनील गौडा पाटील यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची माहिती दिली असता त्यांनी तातडीने प्रतिसाद देत मोफत उपचार केले. यातून तरुणाचा पुनर्जन्म झाला आहे.
सुनील गौडा पाटील म्हणाले की, संकटात सापडलेल्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. हा तरुण गरीब होता आणि त्याला आधार देणारे कोणी नव्हते. त्यामुळे मी त्याला स्टेंट प्रत्यारोपण करून उपचारासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले
0 Comments