- सीमाभागावर 'पीएचडी 'करणारे चंदगड मधील प्रथम व्यक्तिमत्त्व
![]() |
फोटो सौजन्य : लक्ष्मण यादव (चंदगड) |
चंदगड / लक्ष्मण यादव
कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यलय कोवाड कॉलेजचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम मोठया थाटामाटात संपन्न झाला. यावेळी प्रा. विठ्ठल दळवी लिखित महाराष्ट्र -कर्नाटक सीमावाद आणि मराठी भाषिक या पुस्तकाच प्रकाशन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ए. एस. जांभळे होते.
डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते चालू वर्षातील विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. चंदगड तालुका हे जिल्ह्याच शेवटचे टोक असून अशा दुर्गम तालुक्यात कोवाड सारख्या ठिकाणी कला महाविद्यालय सुरू आहे. कॉलेजसाठी आपल्यापरिने विद्यापीठातील ज्या योजना देता येतील त्या पूर्ण करण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील, प्रा. एन. एस पाटील यानी रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. एम.एस.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ए. के. कांबळे, डॉ. सुनीता कांबळे यांनी केले. आभार डॉ. विठ्ठल दळवी यांनी मानले.यावेळी संस्था उपाध्यक्ष बी. आर. पाटील, सचिव एम. व्ही. पाटील, गोविंद प्रभू पाटील , प्रा. दिपक पाटील, प्रा. आर. टी. पाटील, आर. डी. कांबळे, प्रा. मोहन घोळसे आदिंसह प्राध्यापक, आजी-माजी विद्यार्थी, उपस्थित होते.
0 Comments