बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यात विविध पोलीस स्थानकांच्या हद्दीत जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थांचा साठा शुक्रवारी न्यायालयाच्या आदेशावरून नष्ट करण्यात आला.
जिल्ह्यातील एकूण 39 प्रकरणात जप्त केलेला 703.095 किलो गांजा ड्रग कंट्रोलरआणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला. 19.74 लाख रुपये किंमतीचा हा साठा होता.सौंदत्ती तालुक्यातील यरगट्टीजवळ हारुगोपगावाजवळ एका शेतात गांजाचा हा साठा नष्ट करण्यात आला.
0 Comments